केन्द्रच्या “अनलॉक – 5” च्या सूचनां पाठोपाठ महाराष्ट्र राज्य शासनानेही आपल्या मिशन बिगिन अगेन च्या सूचना जाहिर केल्यात.
राज्यान्तर्गत प्रवासी रेलवे गाड्या तसेच पुणे सबर्बन सेवा तत्काळ सुरु करण्यात येतील असे आश्वासन याद्वारे मिळाले आहे. आजपासून जवळ जवळ दोन आठवड़े बऱ्याच स्पर्धा आणि प्रवेश परीक्षा राज्यात सुरु होत आहे. त्या अनुषांगाने आता मध्य रेलवे ने पुढाकार घेवून पुणे – लोनावला, पुणे – दौंड, बारामती लोकल्स लवकर सुरु कराव्यात. तसेच मुम्बई – नागपुर मार्ग अगदी रिकामा पडलेला आहे. या मार्गावर केवल एक लाम्ब पल्याची हावडा मुम्बई मेल सुरु आहे. ही गाड़ी ही आठवड्यात केवळ 3 दिवस धावत आहे. या मार्गावरील मुम्बई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, मुम्बई नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस सुरु करण्याची अपेक्षा आहे.
राज्यातील इतर गाड्या मुम्बई जालना जनशताब्दी, मुम्बई नान्देड देवगिरी, तपोवन एक्सप्रेस, मुम्बई सोलापुर सिध्देश्वर एक्सप्रेस, मुम्बई – पुणे दरम्यान इंद्रायणी, प्रगति, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, तसेच मुम्बई – कोल्हापुर मार्गावरील महालक्ष्मी, सह्याद्रि एक्सप्रेस सुरु करण्यात याव्या. मुम्बई सावंतवाड़ी, रत्नागिरी साठी तुतारी एक्सप्रेस ही रात्रकालीन गाड़ी सुरु करण्यात आलेली आहे, परंतु या मार्गावरील दिवसकालीन गाड्या जनशताब्दी, मांडोवी एक्सप्रेस सुरु केल्या गेल्यात तर प्रवाश्यान्ना अतिशय सोईचे होणार आहे. तसेच नागपुर – नान्देड मार्गावरील नंदीग्राम, नागपुर – बल्हारशाह पैसेन्जर, अकोला – नान्देड मार्गावरील पैसेन्जर सुरु केल्यात तर या मार्गावरील प्रवासी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील मुख्यलयांना जोडले जातील.
राज्यान्तर्गत रेलवे च्या प्रवासी सेवा तत्काळ सुरु करण्याच्या निर्णयाने सर्व विद्यार्थी, व्यापारी, व्यवसायिक आणि रोज अप डाउन करणारे प्रवासी आनंदुन गेलेले आहेत. राज्यातील सर्व थरातून या निर्णयावर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हार्दिक आभार व्यक्त केले जात आहेत.

Very Nice Decision
LikeLike