उदय जोशी यांज कडून –
भुसावळ मंडल मधील विशेष गाड़ी च्या थांब्यामध्ये बदल
रेलवे प्रशासन कडून सुरु करण्यात आलेली विशेष गाड़ी यांच्या थांबा मध्ये बदल करण्यात आला आहे . हा बदल भुसावल मंडळांमध्ये लागू राहील . तो बदल पुढीलप्रमाणे,
1) गाडी क्रमांक 01071 डाऊन लोकमान्य टिळक वाराणसी विशेष गाडी ही दिनांक 01.12.2020 पासून लासलगाव, नांदगाव,नेपानगर या स्टेशन वर थांबणार नाही.
2) गाडी क्रमांक 01093/02193 डाऊन मुंबई वाराणसी ही गाडी दिनांक 01.12.2020 पासून नांदगाव,रावेर, नेपानगर स्टेशन वर थांबणार नाही.
3) गाडी क्रमांक 03202 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस पटना विशेष गाडी ही दिनांक 06.12.2020 पासून देवळाली,लासलगाव,नांदगाव,नेपानगर या स्टेशन वर थांबणार नाही.
4) गाडी क्रमांक 01077 डाऊन पुणे जम्मू तावी विशेष गाडी ही दिनांक 01.12.2020 पासून नांदगाव या स्टेशनवर थांबणार नाही.
5) गाडी क्रमांक 01039 डाऊन कोल्हापूर गोंदिया विशेष गाडी ही दिनांक 01.12.2020 पासून जलंब या स्टेशनवर थांबणार नाही.
6) गाडी क्रमांक 01418/02042 अप नागपूर-पुणे विशेष गाडी ही दिनांक 01.12.2020 पासून चाळीसगाव या स्टेशनवर थांबणार नाही.
7) गाडी क्रमांक 02223 डाऊन पुणे अजनी विशेष गाडी ही दिनांक 01.12.2020 पासून नांदुरा या स्टेशनवर थांबणार नाही.
वरील सर्व बदलांची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.
भुसावल मंडल
दिनांक – 05.12.2020