23 मार्च 2020, एक घोषणा, एक निर्णय आणि देशाभरातील सर्व गाव, शहर, वाहतूक, व्यापार उदिम एका घटकेत बन्द झाले. रस्ते, रेलवे स्टेशन सारे ओस पडले. लोक घरात बंदिस्त झाले आणि देवालाय ही कुलप बन्द झाली. सम्पूर्ण लॉक डाउन.
10 आठवड़े असेच गेले, लोक एकमेकांकडे संशयाने पाहात होते. जनमानसांच्या मनात संसर्गाविषयीची प्रचंड भीती होती. परगावी जाणे तर दुरच पण साधे एकमेकांना भेटणे सुद्धा टाळले जात होते. प्रत्येक वाहतुकीची साधने मग ती सरकारी रेलवे असो, बसेस आसोत की ऑटोरिक्शा सर्व बन्द होत्या.
एखादे वादळ निवल्यावर जसे हळूच दार किलकिले करून बघतात तसे हळूहळू अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहतूक व्यवस्थेच्या साधनांनी आपले पाय बाहेर काढण्यास सुरवात केली. लोक बाहेर पडू लागली. बंधने, नियम कठोरपणे राबवीली जात होती. जागोजागी अडकलेली मुले माणसे आपापल्या घराकडे परतत होती. प्रत्येकाला आपापला जीव प्यारा होता. मन्दिर, धर्मस्थळे अजूनही बन्दच होती. 1 जून, मग 12 जून अश्या ठराविक अन्तराने रेलवे गाड्या सुरु करण्यात आल्या, बसेस व इतर वाहतुकीची साधनेही निर्बंधाने का असेना पण सुरु व्हायला लागली होती. मुलांच्या परीक्षा, सभा समारंभ उरकून घ्यायला सुरवात झाली, लग्न सोहळे मोजक्या उपस्थितीत पार पडायला लागले. दुकान, शॉपिंग मॉल, सुपर मार्केट, व्यायामशाळा, चित्रपटगृह देखील उघड़ली, गणोशोत्सव, नवरात्र, दसरा गेला, दिवाळी सुद्धा आटोपली परंतु मन्दिर, देवदर्शन मात्र अद्याप ही बन्द होती.
मंदिर, देवालय वर जगणारी गावच्या गाव ओस पडली होती. हार, फुले यांचा व्यवसाय करून पोट भरणारी दुकान अगदी सर्वांना टाळे लागले होते. होटल्स, उपहारगृहे, छोटे मोठे वाहतुकदार, ऑटोरिक्शा चालक, ट्रेवल्सवाल्यांचे चाक जाम झाले होते. मंदिर परिसरावर जगणारी आणि तगणारी अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली होती. अखेर 16 नोव्हेम्बर ला मंदिरे उघड़न्यास, भाविकाना देवाचे दर्शन करन्यास परवानगी दिली गेली. परवानगी दिली गेली परंतु बंधने अनेक. प्रत्येक दर्शनार्थिचे नाव, गाव, पत्ता, त्याची थर्मल तपासणी, जागोजागी सैनिटाइजेशन, दर्शनाची ऑनलाईन नोंदणी. हार, फुले, तीर्थप्रसाद वितरणला मनाई.




आज जवळपास मन्दिर, धर्मस्थळ उघडून 20 दिवस लोटले आहेत परंतु देवांच्या संतांच्या या गावांत अजूनही शुकशुकाटच आहे. जनमानसांच्या कमी भाडयात वाहतूक करणाऱ्या रेलवे पसेंजर गाड्या आजपावेतो बन्द असल्याने आणि वीना आरक्षण रेलवे प्रवास करण्यास मनाई असल्याने सामान्य जनता इच्छा असुनही देव दर्शन घेण्यास हतबल ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी गजबजुन गेलेली शेगाव, शिर्डी, पंढरपुर, त्र्यंबकेश्वर या सारखी गावे आज भाविक आणि पर्यटकांच्या अभावी भणभणीत पडली आहेत.
आता याकडे राज्य प्रशासनाने लक्ष देण्याची आत्यंतिक गरज आहे. रेलवे प्रशासन राज्यांकडे पाहात आहे, त्यांच्या आदेशानुसार रेलवे गाड्या सुरु होण्यास तयार आहेत. जसे द्वितीय श्रेणी चे टिकिट आणि सर्व साधारण पैसेन्जर गाड्या सुरु होतील तसतसे सामान्य नागरिक घराबाहेर पडतील. उत्तर भारतातील बहुतांश प्रांतात माफक दरात प्रवाश्याची वाहतूक करणाऱ्या पैसेन्जर गाड्या सुरु झालेल्या आहेत. आता संक्रामणाची स्थिति ही बऱ्यापैकी आटोक्यात आहे आणि जनता ही खुपशी जागरूक आणि सजग झालेली आहे. आता प्रशासनाच्या योग्य अशा लोकहित निर्णयाची आत्यंतिक गरज आहे, संत आणि देव त्यांना सद्बुद्धि देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.