11120/19 भुसावळ इगतपुरी भुसावळ मेमू दिनांक 10/11 जानेवारी पासून सुरु होत आहे. यच्चयावत स्थानिक वार्तापत्रांनी देवळाली शटलची वेळ बदलली असा सुर लावला आहे. आज आम्ही पुन्हा एकदा सर्व हकीकत, पुराव्यासोबत तुम्हांसमोर आणित आहोत, मुळात ही देवळाली शटल नाहीय तर भुसावळ – मुम्बई सवारीचे शून्याधारित वेळापत्रकात बदललेले रूप आहे.



ही लिस्ट आहे, शून्याधारित टाइमटेबल मधे बदलल्या जात असलेल्या सवारी गाड्यांची. यात अनुक्रम क्र 19 आणि 20 बघा. गाड़ी क्र 51153 मुम्बई भुसावळ पैसेंजर बदलून 11119 इगतपुरी भुसावळ मेमू होत आहे तसेच गाड़ी क्र 51154 भुसावळ मुम्बई पैसेंजर ही गाड़ी 11120 भुसावळ इगतपुरी मेमू होत आहे. सदर मेमू गाड़यांचे वेळापत्रक सुद्धा परिपत्रकात दिल्याप्रमाणेच आहे, त्यात काड़ी मात्र बदल नाही.
देवळाली भुसावळ देवळाली ही गाड़ी जूना क्रमांक 51181 आणि 51182 या सूची मधे क्र 4 आणि 5 वर आहे. त्यांचे नवीन गाड़ी क्र 11113 आणि 11114 असे राहणार असुन वेळापत्रकात बदल होवून 11113 देवळाली भुसावळ मेमू देवळाली हुन सकाळी 5:15 ऐवजी सकाळी 7:20 ला निघेल आणि भुसावळ ला सकाळी 10:05 ऐवजी दुपारी 12:15 पोहोचेल.
तेव्हा मित्रांनो उगाच भ्रमात राहु नका, सुरु झालेली मेमू गाड़ी देवळाली शटल नसून भुसावळ मुम्बईचे, मुम्बई कनेक्शन कापलेले, शून्याधारित टाइमटेबल के रूपांतरण, इगतपुरी भुसावळ मेमू आहे.
ज्या ज्या गाड्या शून्याधारित टाइमटेबल मधे नियमित होत आहेत त्यांना नियमित गाड़ी क्रमांक दिले जात आहेत. इगतपुरी भुसावळ इगतपुरी मेमू ला नियमित गाड़ी क्रमांक 11119/20 आणि भुसावळ इटारसी भुसावळ मेमू ला 11115/16 असे नियमित गाड़ी क्रमांक मिळालेले आहेत आणि या गाड्या सुरु होत आहेत. ज्या गाड्यांत अजुनही बदल होण्याची शक्यता आहे त्या गाड्या सध्या 0 क्रमांक ने सुरु आहेत.
मला वाटते, तुमच्या समोर सद्यस्थिति मी व्यवस्थित माण्डलेली आहे.