संक्रमणकाळात बन्द झालेली पुणे – भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस अखेर 10 जुलै पासून पुणे येथून आणि 11 जुलै पासून भुसावळ येथून दर रोज सुरु होत आहे.
आता सुरु होण्याची घोषणा झाली मग कवित्व ते काय? पण मित्रांनो प्रशासनिक कामाची एक आगळीवेगळी पद्धत असते. रेल्वे विभागाने ही गाड़ी अगदी सुरुवातीला भुसावळ ला विस्तारित केली गेली होती, तिला परत त्याच स्थितितुन सुरु करावयाचे ठरविले आहे. आता हे आणखी काय? तर असे आहे, या गाडीचे देवलाली, कजगाव हे थाम्बे रद्द दिसत आहेत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आग्रहामुळे, त्यांच्या सुविधेकरिता दोन स्लीपर कोच जोडण्याची व्यवस्था प्रयत्नपूर्वक केली होती. परंतु आता ही गाड़ी केवळ द्वितीय श्रेणी सिटिंग आणि वातानुकूलित सिटिंग अशीच उपलब्ध होत आहे.



कजगाव चा थांबा भुसावळ – पुणे जातांना दिलेला आहे, पुणे भुसावळ प्रवासात नाही आणि देवलाली तर दोन्ही दिशेने रद्द केला गेला आहे. या गाडीचा रेक शेयरिंग पुणे सोलापुर पुणे गाडी शी केला गेल्याने आणि त्या मार्गावर ती गाड़ी केवळ दिवसात धावत असल्याने पूर्ण सिटिंग असली तरी विशेष असा त्रास प्रवाश्यांना होत नाही. परंतु भुसावल – पुणे या प्रवास ही गाड़ी ‘ओव्हर नाईट’ प्रवास करत असल्याने स्लीपर कोच असणे आवश्यकच आहे. तसे गेल्या काळात लावले देखील होते. पण नव्याने सुरवात करतांना मागचे सर्व विसरून रेल्वेने परत तीच सर्कस स्थानिकांपुढे ऊभी केलेली आहे.
शिवाय या स्लीपर कोच ला सोलापुर भागात ही उत्तम प्रतिसाद आहे. त्या प्रवासात देखील ते डबे पूर्ण बुक होतात. याचा अर्थ असा आहे की सोलापुर – पुणे – भुसावळ अशा सम्पूर्ण प्रवासात 2 स्लीपर डबे वाढवले तरी कोणाची काही हरकत नसावी. बस रेलवे प्रश्सननाने आपली तांत्रिक बाजू पहावी. यासर्व प्रकारात पुन्हा लोकप्रतिनिधि ना दखल घ्यावी लागेल, म्हणजे आहे की नाही गिरवायचे, पुन्हा पाढ़े पंचावन्न? ☺️