परवाच आम्ही नागपुर, नवी अमरावती आणि खामगांव हुन पंढरपुर वारीच्या गाड्यांची सूचना दिली होती. याच यादी मधे आणखी ही रेलवे गाड्या खालीलप्रमाणे आहेत. चला तर मग, जय हरी विठ्ठल च्या गजराने पंढरी दुमदुमवु या.

1) 01101 लातूर पंढरपुर एक्सप्रेस दिनांक 5, 6, 8, 11, 12 आणि 13 जुलैला लातूर येथून 2 एसएलआर, 4 जनरल, 8 स्लीपर, 2 वातानुकूलित थ्री टियर, 1 वातानुकूलित टू टियर अश्या 18 डब्यांची गाड़ी चालणार आहे. परतीला 01102 पंढ़रपुर लातूर एक्सप्रेस दिनांक 5, 6, 8, 11, 12 आणि 13 जुलैला पंढ़रपुर येथून सुटेल.
2) 01107/08 मिरज पंढरपुर मिरज अनारक्षित विशेष दिनांक 05 जुलै ते 14 जुलै दोन्ही दिशेने दररोज धावेल. या गाडीत 12 जनरल द्वितीय श्रेणी आणि 2 एसएलआर डबे असतील.
3) 01109/10 कुरडुवाडी पंढरपुर कुरडुवाडी अनारक्षित विशेष दिनांक 05 जुलै ते 14 जुलै दोन्ही दिशेने दररोज धावेल. या गाडीत 12 जनरल द्वितीय श्रेणी आणि 2 एसएलआर डबे असतील.
4) 01111 पंढरपुर मिरज एक्सप्रेस दिनांक 04, 05, 09 आणि 11 जुलै ला पंढ़रपुर येथून 2 एसएलआर, 4 जनरल, 6 स्लीपर, 1 वातानुकूलित थ्री टियर, 1 वातानुकूलित टू टियर/ वातानुकूलित थ्री टियर अश्या 14 डब्यांची गाड़ी चालणार आहे. परतीला 01112 मिरज पंढ़रपुर एक्सप्रेस दिनांक 04, 05, 09 आणि 11 जुलै ला मिरज येथून सुटेल.
5) 01113/14 सोलापूर पंढरपुर अनारक्षित विशेष डेमू दिनांक 05 जुलै ते 14 जुलै दोन्ही दिशेने दररोज धावेल. या गाडीत अनारक्षित 10 डबे असतील.
6) 01115 नागपूर मिरज एक्सप्रेस दिनांक 06 आणि 09 जुलै ला नागपूर येथून 2 एसएलआर, 6 जनरल, 8 स्लीपर, 2 वातानुकूलित थ्री टियर अश्या 18 डब्यांची गाड़ी चालणार आहे. परतीला 01116 मिरज नागपूर एक्सप्रेस दिनांक 07 आणि 10 जुलै ला मिरज येथून सुटेल.
7) 01117 नागपूर पंढ़रपुर एक्सप्रेस दिनांक 07 आणि 10 जुलै ला नागपूर येथून 2 एसएलआर, 6 जनरल, 8 स्लीपर, 2 वातानुकूलित थ्री टियर अश्या 18 डब्यांची गाड़ी चालणार आहे. परतीला 01118 पंढ़रपुर नागपूर एक्सप्रेस दिनांक 08 आणि 11 जुलै ला पंढ़रपुर येथून सुटेल.
8) 01119 नवी अमरावती पंढ़रपुर एक्सप्रेस दिनांक 06 आणि 09 जुलै ला नवी अमरावती येथून 2 एसएलआर, 4 जनरल, 8 स्लीपर, 4 वातानुकूलित थ्री टियर अश्या 18 डब्यांची गाड़ी चालणार आहे. परतीला 01120 पंढ़रपुर नवी अमरावती एक्सप्रेस दिनांक 07 आणि 10 जुलै ला पंढ़रपुर येथून सुटेल.
9) 01121 खामगाव पंढ़रपुर एक्सप्रेस दिनांक 07 आणि 10 जुलै ला नागपूर येथून 2 एसएलआर, 4 जनरल, 8 स्लीपर, 4 वातानुकूलित थ्री टियर अश्या 18 डब्यांची गाड़ी चालणार आहे. परतीला 01122 पंढ़रपुर खामगाव एक्सप्रेस दिनांक 08 आणि 11 जुलै ला पंढ़रपुर येथून सुटेल.
या यादी मधील क्रमांक 6, 7, 8, आणि 9 या गाड्यांचे वेळापत्रक आधीच दिलेले आहे. आपणा सर्व वारी भक्तांना नम्र विनंती आहे, रेल्वे च्या हेल्पलाइन 139 किंवा रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट वरुन वेळापत्रकाची माहिती घ्यावी. तसेच अनारक्षित गाड्यांमधे जसे सर्व डबे सामान्य तिकीट साठी असतील आणि आरक्षित गाड्यांचे एसएलआर आणि जनरल डबे ही अनारक्षित आहेत. यातील आरक्षित डब्यांचे आरक्षण 27 जून पासून सुरु केले जात आहे. जय हरी।।