भुसावळ विभागातुन नवी अमरावती, खामगांव ते पंढरपुर आशा दोन गाड्या आणि नागपुर – मिरज, नागपुर – पंढरपुर या भुसावळ मार्गे जाणाऱ्या दोन गाड्या वारी विशेष म्हणून आषाढी साठी सोडण्यात येणार आहेत. अर्थात याची सविस्तर बातमी आम्ही आधीच दिलेली आहे.
आता आजच भुसावळ हुन देखील 01129/30 ही आषाढी यात्रा एक फेरी विशेष गाडीची घोषणा झाली आहे.
01129 भुसावळ पंढरपुर अनारक्षित विशेष 09 जुलै शनिवार ला दुपारी 13:30 ला भुसावळ येथून मनमाड़, दौंड, कुरडूवाड़ी मार्गे दी5 10 जुलै ला पहाटे 3:30 ला पंढरपुर येथे पोहोचणार आहे. परतीचा प्रवास 01130 पंढरपुर भुसावळ अनारक्षित विशेष दिनांक 10 जुलै रविवारी रात्री 22:30 ला पंढरपुर येथून निघुन सोमवारी दिनांक 11 जुलै ला दुपारी 13:00 ला भुसावळ ला पोहोचेल. सदर गाडीला 14 जनरल, 2 स्लीपर आणि 2 एसएलआर असे एकूण 18 डबे राहतील आणि भुसावळ येथून सुटून जलगांव, पाचोरा, चालीसगांव, नांदगांव, मनमाड़, कोपरगाँव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुरडू वाड़ी आणि पंढरपुर ऐसे थाम्बे राहतील. वेळा पत्रक सोबत जोडलेले आहे.
