सध्या पंढरपुर ची वारीचे वातावरण आहे आणि रेलवे प्रशासनाने त्या निमित्त जवळपास 12 – 14 जोड़ी परतीच्या गाड्यांची घोषणा देखील केलेली आहे. नागपुर येथून 2, नवी अमरावती, खामगांव, भुसावळ, औरंगाबाद इत्यादि ठिकाणावरुन पंढरपुर साठी परतीच्या विशेष गाड्या रेलवे प्रशासन सोडणार आहे. या सर्व विशेष गाड्या आरक्षित वा अनारक्षित असून अर्थातच योग्य ते रेलवे टिकिट खरेदी करून प्रवास करावा लागणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वी चाळीसगाव येथील आमदार मा. चव्हाण यांनी चाळीसगाव ते पंढरपुर अशी परतीची विशेष FTR गाड़ी बुक करून परिसरातील जवळपास 1500 वारकरयांना देवाची वारी घडवून आणली. या निमित्ताने बऱ्याच जणा ना हे FTR म्हणजे काय असते याचा प्रश्न पडला, त्यासाठीच हा खटाटोप.
FTR म्हणजे फूल टेरिफ रेट अर्थात सम्पूर्ण गाड़ी, परतीचे देखील आगावू भाड़े देवून बुक करणे. या पद्धति मधे सम्पूर्ण गाड़ी तसेच एखादा डबा सुद्धा बुक करता येतो. मा. आमदार साहेबांनी या करीता जवळपास 24 लाख रुपये रेलवे भाड़े खर्च केले आणि स्वखर्चाने परिसरातील भाविकांना पंढरपुर ची वारी घडवून आणली.

FTR योजनेत किमान 6 महीने आधी तर जास्तीत जास्त 30 दिवसापूर्व आपली मागणी नोंदवावी लागते. सम्बन्धित क्षेत्रीय रेलवे च्या FA & CAO कड़े रु 50,000 प्रति डबा प्रमाणे किमान 18 डब्यांची रु 9,00,000 लाख अनामत रक्कम रोख अथवा डिमाण्ड ड्राफ्ट द्वारे जमा करावी लागते. साधारणतः प्रवासाच्या 72 तास आधी रेल्वेचे कन्फर्मेशन मिळते आणि आपल्या मागणी नुसार 48 तासांपूर्वी सर्व रेलवे भाड़े रेलवे विभागात टिकिट खरेदी करून जमा केले जाते.

सदर प्रवासात एकेरी प्रवास कमीत कमी 500 किलोमीटर ग्राह्य समजला जातो. परतीच्या प्रवासा सहित देय भाड़े + 30% सेवा कर + रु 900/- प्रति तास थाम्बा चार्ज + 200 किलोमीटर चे एम्प्टी हाउलेज चार्ज अशी भाड़े मोजणी केली जाते.
लग्नाची वरात किंवा खाजगी पर्यटन साठी FTR सेवा अतिशय उपयुक्त आहे.