
20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस 19 जानेवारीपासून आणि 20926 अमरावती – सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस 20 जानेवारीपासून आठवड्यातुन तीन दिवस धावेल. सध्या या गाड्या आठवड्यातून दोनदा धावत आहेत.

20925 सुपरफास्ट इंटरसिटी सुरत ते अमरावती 19 जानेवारीपासून दर गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल. परतीच्या दिशेने 20926 ही गाडी 20 जानेवारीपासून दर शुक्रवार, शनिवार आणि सोमवारी अमरावती ते सुरतपर्यंत धावेल. लक्षात घ्या, ही गाड़ी संक्रमणपूर्व काळात याच दिवसात चालविली जात होती, जी आता पूर्णपणे पूर्ववत झालेली आहे. प्रवाशांच्या आग्रहाच्या मागणीमुळे आता या गाड्यांमध्ये दोन स्लीपर कोचही बसवण्यात आले आहेत, ही आनंदाची बाब आहे.
पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक डीआरएम यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी देण्यात आलेली आहे.