13 जानेवारी 2023, माघ, कृष्ण पक्ष, षष्ठी, विक्रम संवत 2079
पाचोरा – जामनेर ह्या नैरो गेज रेल्वेचे ब्रॉड गेज मधे रुंदीकरण आणि जामनेर हुन पुढे बोदवड पर्यंत विस्तार हे रेलवे विकास काम जळगाव जिल्ह्यात अदमासे नोव्हेम्बर 2023 पासून सुरु होण्याची अपेक्षा आहे. त्या सन्दर्भात जमीन मोजणी, अधिग्रहण इत्यादि कामे लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. परन्तु यानिमित्त रेलवे अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे आधीच सुरु झालेले आहेत.
भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस एस केडिया यांनी पाचोरा – जामनेर छोट्या नैरो गेज रेल्वे मार्गाची पाहणी केली. यासाठी त्यांनी भुसावळ ते पाचोरा टॉवर वॅगन ने आणि पाचोरा ते जामनेर रस्त्याने प्रवास केला.
पाचोरा नॅरो गेजचा प्लॅटफॉर्म, सी एण्ड डब्ल्यू विभाग आणि रेल्वे ट्रॅकची पाहणी केली.
वरखेडी, शेंदुर्णी, पहूर स्थानकांची पाहणी करतांना, नकाशा पडताळून आवश्यक त्या सूचना दिल्या.
पहूर स्थानकाच्या जवळ, वाघूर नदीवर बांधलेल्या ब्रिटिश कालीन पुलाचे निरीक्षण केले. हा पूल खूप जुना असून तो 1918 मध्ये बांधण्यात आला होता.
जामनेर स्थानकाची व आरक्षण केंद्राची पाहणी, जामनेर स्थानकावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या रेल्वे संग्रहालयाच्या जागेची पाहणी करण्यात आली. योग्य ते बदल करण्यास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
पाहणीवेळी डॉ.शिवराज मानसपुरे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, वरिष्ठ विभागीय अभियंता समन्वय श्री.तरुण दंडोतिया, उपमुख्य अभियंता बांधकाम श्री.पंकज धावरे व इतर अधिकारी उपस्थित होते.


