18 मई 2023, गुरुवार, जेष्ठ, कृष्ण पक्ष, चतुर्दशी, विक्रम संवत 2080
“गरीबाची गाय अन कुठ बी घेऊन जाय” वाली गत आहे बघा. रेल्वे विभागात ज्या पण कमी अन्तर चालणाऱ्या किंवा पैसेंजर गाड्या आहेत त्यांना फारशी किंमत नसावी असे वाटते. जेवढ़या पैसेंजर होत्या त्यांना केवळ आसान व्यवस्था असलेल्या मेमू गाड्यांमधे बदलण्यात आलेले आहे. राहता राहिल्या गोदावरी, हुतात्मा सारख्या छोट्या इण्टरसिटी गाड्या त्यांत रेल्वे कधीही, काहीही बदल करीत असते. मार्गावर काही काम निघाले की या गाड्या सर्वात आधी डूबत खात्यावर धरल्या जातात.
मनमाड़ गोदावरी चे काय झाले ते तर ठाऊक आहे न? गेले वर्ष होईल, ती गाड़ी विशेष म्हणून चालत होती आणि आता तीन दिवस मनमाड़ हुन आणि तीन दिवस धुळे हुन सुटत आहे. भुसावळ पुणे दरम्यान दररोज मनमाड़, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे चालणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस ही गाड़ी सुद्धा रेल्वे विभागाचे सॉफ्ट टारगेट आहे. सध्या पुणे येथे यार्ड रिमॉडलिंगचे काम सुरु होणार आहे. झाल, हुतात्मा एक्सप्रेसची अशीतशी.
11025/26 पुणे – भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस सम्पूर्ण महीनाभर, दिनांक 20 में पासून दिनांक 19 जूनपर्यन्त केवळ इगतपुरी ते भुसावल इतकीच चालणार आहे. ही गाड़ी इगतपुरी ते पुणे दरम्यान, या कालावधि मधे रद्द राहील.

आता प्रवाश्यांचे कशी दुर्दशा होणार ते बघा. भुसावळ ते कल्याण, पनवेल, चिंचवड़, पुणे चे प्रवासी इगतपुरी पर्यंत जावून काय करणार? त्यातल्या त्यात हुतात्मा एक्सप्रेस चा 17 कोच चा मुळ रैक सोलापुर – पुणे दरम्यान चालेल आणि भुसावळ – पुणे हुतात्मा साठी भुसावळ – इगतपुरी 8 डब्या ची जी मेमू चालते तोच रैक वापरला जाईल. कुठे 17 कोच ची पूर्ण गाड़ी आणि कुठे 8 कोच ची मेमू? सरळ 9 कोच म्हणजे 900 सीट्स कमी. केवळ मेमू रैक असल्याने नियमित असणारी एक वातानुकूल चेयर कार पण राहणार नाही.
सरळ एक महीना हा त्रास भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेसच्या प्रवाश्यांना भोगावा लागणार आहे. “आलिया भोगासी असावे सादर” हरि ओम तत्सत!