12118/17 लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड़ च्या दरम्यान चालणारी गोदावरी दाखल तर होत आहे पण पार बदललेल्या स्वरुपात.
आता गोदावरी नाशिककरांसाठी 11 एप्रिल पासून दररोज धावेल पण केवळ 15 में पर्यन्त आणि ते देखील विशेष गाडीच्या स्वरुपात.
विशेष गाड़ी चे स्वरूप म्हणजे काय, तर भाड़े 1.3 पटीने जास्त लागेल. परिपत्रकात वेगळा उल्लेख नाही पण विशेष गाड़ी म्हणजे केवळ आरक्षित आसन व्यवस्था असणे ही स्वाभाविकच तर मित्रांनो, आलिया भोगासी असावे सादर
02102/01 मनमाड़ मुम्बई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी) मनमाड़ उन्हाळी विशेष गाड़ी 11 एप्रिल ते 15 मे पर्यन्त दर रोज धावेल. अर्थात मुम्बई च्या छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर्यन्त धावणार असल्याने वेळेत ही काहीसा बदल आहेच. तो बदल खालील परिपत्रकात समजून घ्यावा आणि जास्तीचे टिकिट दर देवून या गाडीचा अलभ्य (?) लाभ पदरात पाडुन घ्यावा.

ताज्या माहितीनुसार कळत आहे की, द्वितीय श्रेणी चेयर कार च्या 8 डब्याँ पैकी 5 डबे जनरल म्हणजे सामान्य द्वितीय श्रेणी अनारक्षित असणार आहेत. या अनारक्षित प्रवासासाठी सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस चे भाड़े लागेल. उर्वरित द्वितीय श्रेणीचे 3 कोच हे आरक्षित असणार आहे. या व्यतिरिक्त 1 वातानुकूल चेयर कार आणि 2 एसएलआर डबे असतील.
