Stories/ News Alerts

Uncategorised

पुणे – भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस चे कवित्व; पुन्हा वाचावे लागणार पाढ़े पंचावन्नाचे!

संक्रमणकाळात बन्द झालेली पुणे – भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस अखेर 10 जुलै पासून पुणे येथून आणि 11 जुलै पासून भुसावळ येथून दर रोज सुरु होत आहे.

आता सुरु होण्याची घोषणा झाली मग कवित्व ते काय? पण मित्रांनो प्रशासनिक कामाची एक आगळीवेगळी पद्धत असते. रेल्वे विभागाने ही गाड़ी अगदी सुरुवातीला भुसावळ ला विस्तारित केली गेली होती, तिला परत त्याच स्थितितुन सुरु करावयाचे ठरविले आहे. आता हे आणखी काय? तर असे आहे, या गाडीचे देवलाली, कजगाव हे थाम्बे रद्द दिसत आहेत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आग्रहामुळे, त्यांच्या सुविधेकरिता दोन स्लीपर कोच जोडण्याची व्यवस्था प्रयत्नपूर्वक केली होती. परंतु आता ही गाड़ी केवळ द्वितीय श्रेणी सिटिंग आणि वातानुकूलित सिटिंग अशीच उपलब्ध होत आहे.

हा 11025/26 हुतात्मा एक्सप्रेस चा नवा टाइमटेबल
हा 11025/26 संक्रमनपूर्व काळा चा

कजगाव चा थांबा भुसावळ – पुणे जातांना दिलेला आहे, पुणे भुसावळ प्रवासात नाही आणि देवलाली तर दोन्ही दिशेने रद्द केला गेला आहे. या गाडीचा रेक शेयरिंग पुणे सोलापुर पुणे गाडी शी केला गेल्याने आणि त्या मार्गावर ती गाड़ी केवळ दिवसात धावत असल्याने पूर्ण सिटिंग असली तरी विशेष असा त्रास प्रवाश्यांना होत नाही. परंतु भुसावल – पुणे या प्रवास ही गाड़ी ‘ओव्हर नाईट’ प्रवास करत असल्याने स्लीपर कोच असणे आवश्यकच आहे. तसे गेल्या काळात लावले देखील होते. पण नव्याने सुरवात करतांना मागचे सर्व विसरून रेल्वेने परत तीच सर्कस स्थानिकांपुढे ऊभी केलेली आहे.

शिवाय या स्लीपर कोच ला सोलापुर भागात ही उत्तम प्रतिसाद आहे. त्या प्रवासात देखील ते डबे पूर्ण बुक होतात. याचा अर्थ असा आहे की सोलापुर – पुणे – भुसावळ अशा सम्पूर्ण प्रवासात 2 स्लीपर डबे वाढवले तरी कोणाची काही हरकत नसावी. बस रेलवे प्रश्सननाने आपली तांत्रिक बाजू पहावी. यासर्व प्रकारात पुन्हा लोकप्रतिनिधि ना दखल घ्यावी लागेल, म्हणजे आहे की नाही गिरवायचे, पुन्हा पाढ़े पंचावन्न? ☺️

Uncategorised

हुतात्मा का शेड्यूल आ गया : 10/11 जुलै से पुणे – भुसावल के बीच चलना शुरू कर देगी हुतात्मा

आज घोषित 26 मेल/एक्स एवं 104 सवारी गाड़ियोंमे से मध्य रेल की 4 जोड़ी गाड़ियोंकी समयसारणी जारी हो गयी। कृपया निम्नलिखित परिपत्रक देखे।

1) 11026 पुणे भुसावल हुतात्मा दिनांक 10 जुलै से और 11025 भुसावल पुणे हुतात्मा दिनांक 11 जुलाई से प्रतिदिन चल पड़ेगी।

2) 11305 सोलापुर गदग एक्सप्रेस दिनांक 15 जुलाई और 11306 गदग सोलापुर एक्सप्रेस 16 जुलाई से प्रतिदिन चलना शुरू कर देगी।

3, 4) 01359/60/61/62 दिवा -पेण – दिवा मेमू विशेष दोनों ओरसे दिनांक 05 जुलाई से आरम्भ हो रही है।

Uncategorised

देश भर की 18 मेल/एक्स एवं 104 बन्द पड़ी सवारी गाड़ियाँ जल्द ही पटरियों पर दौडेगी। जिसमे मध्य रेल की बहुप्रतीक्षित भुसावल – पुणे हुतात्मा, सोलापुर – गदग और 10 सवारी गाड़ियाँ शामिल

Uncategorised

मध्य रेल्वे तर्फे विठ्ठल भक्तांना ‘जय हरी विठ्ठल’ आषाढी साठी वारी विशेष गाड्या सोडणार

विदर्भ आणि खान्देश मधील वारकऱ्यांसाठी चार गाड्या आणि त्यांचे प्रत्येक दोन फेरे आशा 16 गाड्या वारी विशेष म्हणून चालणार आहेत. या गाड्या नागपुर, नवी अमरावती आणि खामगांव येथून पंढरपुर आणि परत अशा चालणार आहेत. त्यांचे वेळा पत्रक आणि डब्यांची संरचना खालील प्रमाणे आहे.

1) 01115/16 नागपुर मिरज नागपुर विशेष

01115 नागपुर मिरज विशेष दिनांक 6 आणि 9 जुलै ला नागपुर हुन सकाळी 8:50 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 7 आणि 10 जुलै ला सकाळी 11:55 ला मिरजे ला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01116 मिरज नागपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलै ला दुपारी 12:55 ला मिरजे हुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 8 आणि 11 जुलै ला नागपुरला दुपारी 12:25 पोहोचेल. सर्वसाधारण मेल/एक्सप्रेस चे सर्व थाम्बे ह्या गाड्या घेतील. डबे :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18

2) 01117/18 नागपुर पंढरपुर नागपुर विशेष

01117 नागपुर पंढरपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलै ला नागपुर हुन सकाळी 8:50 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 8 आणि 11 जुलै ला सकाळी 8:00 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01118 पंढरपुर नागपुर विशेष दिनांक 8 आणि 11 जुलै ला संध्याकाळी 17:00 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 9 आणि 12 जुलै ला नागपुर ला दुपारी 12:25 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल/एक्सप्रेस चे सर्व थाम्बे ह्या गाड्या घेतील. डबे :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18

3) 01119/20 नवी अमरावती पंढरपुर नवी अमरावती विशेष

01119 नवी अमरावती पंढरपुर विशेष दिनांक 6 आणि 9 जुलै ला नवी अमरावतीहुन दुपारी 14:40 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 7 आणि 10 जुलै ला सकाळी 9:10 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01120 पंढरपुर नवी अमरावती विशेष दिनांक 7 आणि 10 जुलै ला संध्याकाळी 19:10 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 8 आणि 11 जुलै ला नवी अमरावतीला दुपारी 12:40 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल/एक्सप्रेस चे सर्व थाम्बे ह्या गाड्या घेतील. डबे :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 4 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 4 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18

4) 01121/22 खामगांव पंढरपुर खामगांव विशेष

01121 खामगांव पंढरपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला खामगांव हुन सकाळी 11:30 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 8 आणि 11 जुलै ला पहाटे 3:30 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01122 पंढरपुर खामगांव विशेष दिनांक 8 आणि 11 जुलै ला सकाळी 5:00 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 9 आणि 12 जुलै ला खामगांव ला संध्याकाळी 19:30 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल/एक्सप्रेस चे सर्व थाम्बे ह्या गाड्या घेतील. डबे :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18

सर्व विठ्ठल भक्तांनी रेल्वेच्या ह्या वारी विशेष गाड्यांचा लाभ करून घ्यावा। जय हरी!